स्थानिक प्रशासनाचे डिझेल तस्करांना अभय

| उरण | वार्ताहर |

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई, उरण, अलिबाग, रेवस, रेवदंडा, मांडवा, धरमतर खाडी इतर सागरी किनारी डिझेल तस्करी जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनकडून कारवाई होत नसल्याने केंद्रीय प्रशासन सक्रिय झाले आहे, असे बोलले जात आहे. त्यानुसार भारतीय तटरक्षक दलाने मुंबई वायव्येला डिझेलच्या कथित तस्करीत सहभागी असलेली मासेमारी बोट व सुमारे 11 लाख 46 हजार रक्कम जप्त करून पाच खलाशांना अटक केले आहे.

डिझेल तस्करीसाठी जडत वेस्स्ल बाजचा दिशेने (दि.14) एप्रिल रोजी मांडवा बंदरातून निघालेली बोट भारतीय तटरक्षक दलाच्या दोन वेगवान बोट व इंतेरसेप्टर बोटीच्या सहाय्याने आडवली. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात 20 हजार लीटर इंधन साठवण्यासाठी रचनेत बदल केलेली बोट, तसेच ही बोट खोट्या वेगवेगळ्या नावाने चालवली असल्याचे आढळून आले. तसेच कागदपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या विसंगती आढळून आली. यावेळी झडती घेतली असता जडत वेस्स्ल बाजवाल्याना डिझेलच्या बदल्यास देण्यासाठी आणलेली रोख रक्कम 11 लाख 46 हजार रुपये मिळाले. पुढील तपासीकरिता रोख रक्कम व बोट मुंबई बंदरात आणली असून, बोटीचा मालक कोण?, डिझेल तस्करीचा मुख्य सूत्रधार डिझेलमाफिया कोण?, तसेच कुठल्या जडत वेस्स्ल बाजकडून डिझेल घेणार होते? आदी अधिक तपासाकरिता महसूल गुप्तचर संचालनालय सीमा शुल्क विभाग आणि राज्य पोलीस दल यांचा पुढील तपास चालू आहे. महाराष्ट्र तटरक्षक, कस्टम पोर्ट ट्रस्ट, सागरी पोलीस यांना डिझेल तस्करी करणाऱ्यांची माहिती असताना कठोर कारवाई न केल्याने ते रेकॉर्डवरचे गुन्हेगार मोकाट आहेत. त्यामुळे अरबी समुद्रात डिझेल तस्कऱ्यांचा प्रभाव वाढला आहे, अशी चर्चा आहे.

Exit mobile version