| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता 3 स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार सन-2026 या वर्षाकरिता सोमवार, दि.02 मार्च 2026 रोजी होळी, शुक्रवार, दि.28 ऑगस्ट 2026 रक्षाबंधन, शुक्रवार, दि.25 सप्टेंबर 2026 रोजी अनंत चतुर्थी या तीन स्थानिक सुट्ट्यांची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.







