स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: तारीख पे तारीखचा सिलसिला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा नवी तारीख देण्यात आली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत 10 एप्रिलला सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण प्रकरण सादर करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोणताही ठोस निर्णय न्यायालयात होऊ शकलेला नाही. अशातच आणखी एक नवी तारीख न्यायालयाकडून देण्यात आली आहे. आता 10 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणी पार पडेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात गेले आठ महिने ङ्गतारीख पे तारीखफ सुरू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्याने तारखा दिल्या जात आहेत. काल (28 मार्च, मंगळवार) याबाबत सुनावणीची तारीख होती, पण घटनापीठाच्या कामकाजामुळे सुनावणी होऊ शकली नाही. आज सकाळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी साडेदहा वाजता मेन्शनिंग केल्यानंतर एका नव्या तारखेची मागणी करण्यात आली. 92 नगर परिषदांमध्येही ओबीसी आरक्षण लागू व्हावे, बदललेल्या वॉर्डरचनेला दिलेले आव्हान या गोष्टी कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या असल्याने निवडणुका खोळंबल्या आहेत.

Exit mobile version