मुंबई | प्रतिनिधी |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मुंबईतील लोकलसेवा आता 15 ऑगस्टपासून फक्त दोन लसीकरण झालेल्या नागरिकांसाठी सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना केली.
लसीकरणानंतर ज्यांचे 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. सरकार सोमवारपासून एक अॅप सुरु करीत आहेत. त्या अॅपवर लस झालेल्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.त्या नोंदणी झालेल्यांनाच एक ओळखपत्र दिले जाईल.त्यांनाच ही लोकल प्रवासासाठी मुभा दिली जाणार आहे.असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनापाठोपाठ आलेल्या जलप्रलयातही राज्यातील जनतेने मोठ्या धैर्याने संकटावर मात केली.तरीही आता सार्यांचा संयम सुटत आलायं,पण संयम सोडू नका अजूनही कोरोना संपलेला नाही.तिसरी लाट रोखायची जबाबदारी आपली सर्वांची आहे,असे आवाहन त्यांनी केले. हॉटेल,रेस्टॉरन्ट,बार,प्रार्थना स्थळे सुरु करण्याबाबत सोमवारी टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे.असे ते म्हणाले.