लोहप प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय प्रमाणपत्र

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

लोहप येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अविरतपणे सुरू असून त्यांच्याकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. तसेच, रुग्णांमध्ये जनजागृती करण्याचे काम देखील आरोग्य केंद्र करीत आहे. त्यामुळे लोहप प्राथमिक आरोग्य केंद्रला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक 88.31 टक्के गुण मिळवणारे हे पहिलेच प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी कौतुक केले. तसेच, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचर्या उषा वावरे, जिल्हा समन्वयक चित्रा गुरव व जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेश्मा संकपाळ यांचे महत्वाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version