| पेण | प्रतिनिधी |
पेणमध्ये स्त्री शक्तीचा जागर सुरु होत आहे. याचे निमित्त साधत जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली पेण तालुका आरोग्य यंत्रणेकडून 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा अभियान तालुक्यात राबविण्यात येणार आहे.
तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडेकर यांनी कृषीवलला दिलेल्या माहिती नुसार सोमवारी 26 सप्टेंबर रोजी आरोग्य केंद्र वाशी ठिकाण जगदंबा मंदिर, जिल्हा परिषद शाळा वाशी येथे विशेष उपक्रम माता सुरक्षित तर घर सुरक्षित या कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. यावेळी डॉक्टरांकडून महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
मंगळवारी 27 सप्टेंबरला प्राथमिक आरोग्य केंद्र जिते येथे विशेष उपक्रम कोविड 19 मुळे विधवा झालेल्या महिलांची तज्ञ डॉक्टर यांच्याकडून आरोग्य तपासणी व कामार्ली ग्रामपंचायत सावरसई येथे महिलांची तज्ञ डॉक्टर यांच्याकडून नेज्ञ तपासणी.
28 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कामार्ली, 29 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशी कोविड 19 मुळे विधवा झालेल्या महिलांची तज्ञ डॉक्टर यांच्याकडून आरोग्य तपासणी. दि. 30 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जिते ग्रामपंचायत खारपाडा येथे महिलांची तज्ञ डॉक्टर यांच्याकडून आरोग्य तपासणी. 1 ऑक्टोंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गडब ए.एन.सी., पी.एन.सी तसेच इतर स्त्रियांची स्त्रोरोग तज्ञ कडून तपासणी. 3 ऑक्टोंबर प्राथमिक आरोग्य केंद्र गडब ठिकाण वरप येथे तज्ञ डॉक्टर कडून आदिवासी महिलांची तपासणी व देणगीदार यांच्याकडून महिलांना साबण वाटप. दि. 4 ऑक्टोंबर प्राथमिक आरोग्य केंद्र गडब कोविड 19 मुळे विधवा झालेल्या महिलांची तज्ञ डॉक्टर यांच्याकडून आरोग्य तपासणी. या विशेष उपक्रमांचे आयोजन केले आहे. तरी या उपक्रमात महिलांनी आपला सहभाग नोंदवून आरोग्य यंत्रणेला मदत करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी अर्पणा खेडेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.