| पनवेल । वार्ताहर ।
राष्ट्रपुरुषांचे बॅनरवर फोटो लावताना काळजी घ्यावी असे आवाहन स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले आहे.
कोणत्याही शासकीय कार्यक्रमांच्या बॅनरवर व विविध पक्षांच्या बॅनरवर राष्ट्रपुरुषाच्या प्रतिमा लावल्या जातात त्यावेळी त्यांचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या किंवा फोटोच्या बरोबरीने राजकीय नेत्यांचे फोटो लावले जातात. त्यामुळे राष्ट्रपुरुषांचा अवमान होत आहे. तरी यापुढे शासकीय कार्यालयाद्वारे लावण्यात येणार्या बॅनरवर व राजकीय पक्षांच्या बॅनरवर फोटो लावताना योग्य ती काळजीघेण्यात यावी. राष्ट्रपुरुषांचा अवमान होईल अशा प्रकारे बॅनर छापण्यात आले तर स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करील यांची असा इशारा महेश साळुंखे यांनी दिली.