लोकनेते अ‍ॅड. दत्ता पाटील यांची जयंती साजरी

| पेझारी । वार्ताहर ।

लोकनेते अ‍ॅड. दत्ता पाटील तथा दादा महाराष्ट्र राज्याच्या राजकीय, शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रातील एक अत्यंत वादळी आणि व्यक्तिमत्व न्यायालयापासून, विधिमंडळापर्यंत आणि शिक्षणापासून आंदोलनांपर्यंत सर्व दूर समाजाच्या तळागाळातपर्यंत पोहोचलेले सर्वव्यापी खंबीर, अष्टपैलू व्यक्तिमत्व यांची 97 वी जयंती को.ए.सो. ना.ना.पाटील पोयनाड संकुलामध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी को.ए सो. ज्येष्ठ संचालक सुभाष पाटील को.ए.सो. सहमुख्यकार्यकारी अधिकारी अशोक गावडे, प्रा. कमलाकर फडतरे, संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, एस.के.पाटील, तृप्ती पिळवणकर, उदय पाटील, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्व उपस्थितांनी दादांच्या स्मारकातील प्रतिमेस मनःपूर्वक अभिवादन केले.

स्व. दत्ता पाटील यांच्या 97 व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. भाभा विज्ञान मंडळातर्फे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त संपन्न झालेल्या विज्ञान प्रदर्शन प्रतिकृती मधील यशस्वी विद्यार्थ्यांना आकर्षक प्रशस्तीपत्र आणि शालोपयोगी भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version