‘लोना’ला जागतिक मंदीचा फटका

मालाला उठाव नसल्याने कंपनी आठ दिवस बंद

| आपटा | वार्ताहर |

जागतिक मंदीचा फटका लोना इंडस्ट्रीजला बसला असून, कंपनीतून उत्पादन करण्यात येणार्‍या मालाला उठाव नसल्याने कंपनी सप्टेंबर महिन्यात 19 ते 25 रोजीपर्यंत आठ दिवस बंद ठेवण्यात आली होती. कंपनीच्या इतिहासात प्रथमच काम बंद ठेवण्याची नामुष्की ओढावल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, ही कंपनी प्रमुख निर्यातदार आहे. पण, मालाला उठाव नाही. तसेच जागतिक पातळीवर बाजारात असलेली परिस्थिती यामुळेच ही वेळ आल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगितले आहे. कंपनीने नेहमीच कामगार व कर्मचार्‍यांच्या हितसंबंध जपले; परंतु यामुळे कंपनी पण हतबल झाली आहे. भविष्यात पण बाजारात मागणी नसेल तर कंपनीच्या पुढे कोणताही पर्याय नाही. भारतीय बाजारात पण मागणी कमी आहे, यामुळे पण ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

याबाबतीत व्यवस्थापकांनी सांगितले की, परिस्थिती सुधारणा झाली तर नेहमीप्रमाणे कंपनी सुरु राहील. पण मालाला मागणी नसेल तर आम्हाला पर्याय नाही.

Exit mobile version