लोणावळा बोल्डरींग चॅम्पियनशिप उत्साहात


| खोपोली | प्रतिनिधी |

शिवदुर्ग मित्र मंडळ-लोणावळा या गिर्यारोहण क्षेत्रात मान्यवर असलेल्या संस्थेकडून बोल्डरींग चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यात 100 पेक्षाही अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यशवंती हायकर्स खोपोलीचे पद्माकर गायकवाड, कांचनजंगा मांऊटेनियरींगचे दिलीप लागु, एमएसएचे नंदू चव्हाण, पीईएकेचे मुफी लोखंडवाला, अभिजित बर्मन, ठाण्याचे अद्वेत मळेकर, धनाजी लांडगे, रणजीत शिंदे, सुजित तांबे, अतिन साठे यांनी स्पर्धेदरम्यान उपस्थितीत राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.

या स्पर्धेत वयोगट 6 ते 9 वर्ष मुली – : रितिशा ब्रम्हेचा (प्रथम), मीरा चौधरी, (द्वितीय), मुक्ता तळवलकर (तृतीय). 6 ते 9 वर्ष मुले -: अनय पिंगळे (प्रथम), अद्वैत साठे (व्दितीय), सत्यजित नढे (तृतीय). वयोगट 10 ते 13 मुली -: केया रेवनकर (प्रथम), अनहिता अरोरा (द्वितीय), काव्या बोरलीकर (तृतीय), वयोगट 10 ते 13 मुले -: रुद्र करंदीकर (प्रथम), आयुष पवार (व्दितीय), ध्रुव साठे (तृतीय). वयोगट 14 ते 16 वर्ष मुली -: अभिपशा रॉय (प्रथम), अन्वी जैन (व्दितीय), गिरिजा लांडगे (तृतीय). 14 ते 16 वर्ष मुले -: श्रीहान मराठे (प्रथम), आयुष वर्तक (द्वितीय), सोलीन नेवे (तृतीय). खुला गट मुलींमध्ये सिद्धी मनेरीकर -: (प्रथम), श्रुती शिंदे (द्वितीय), कृष्णा पटेल (तृतीय). खुलागट मुलांमध्ये साहील खान -: (प्रथम), अजीज शेख (द्वितीय), अर्चीत मीटबावकर (तृतीय).सर्व विजेत्या स्पर्धकांना आयोजकांकडून प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्हं देण्यात आली.

लहान गटात 6 ते 9 अनुक्रमे प्रथम 5000/-, द्वितीय 3000/- तृतीय 2000/- तर पुढील सर्व गटांना अनुक्रमे प्रथम 10000/-, द्वितीय 7000/- तृतीय 5000/- अशी बक्षिसाची रक्कम चेक स्वरूपात देण्यात आली. त्याच सोबत दि हिमालयीन क्लबच्या वतीने एक वर्ष हिमालयीन क्लबची मेंबरशीप, चॉक बॅग, कॅराबिनर आणि डीसेंडरदेखील देण्यात आले. दिपक क्लायबींग इन्स्टिट्यूट व अवींळीश यांच्याकडून विजेत्यांना वॉटर बॉटल आणि वुडन होल्ड भेट स्वरूपात दीले गेले. बक्षीस वितरण समारंभ लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, गिर्यारोहक कपिलेश्‍वर रत्नाकर, विनीता मुनी, दिव्येश मुनी, राजेश गाडगीळ, राजेंद्र शिंदे, सुरेश गिद, वसुंधरा दुर्गे, देविदास कडु इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेसाठी स्पोर्टस क्लायंबिंग फेडरेशन ऑफ इंडिया, स्पोर्टस क्लायंबिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच प्राजक्ता घोडे यांनी ज्युरी प्रेसिडेंट म्हणून काम पाहिले, तर श्रीपाद सपकाळ, किशोर चव्हाण, नवनाथ पवार, प्रवीण सावंत यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. रुट सेटर म्हणून राहुल पेंडसे, दिपक पवार, ध्रुव विश्‍वासराव यांनी काम पाहिले. कृष्णा ढोकळे, समिरन कोल्हे, वर्षा खाटींग, हनुमान खाटींग यांनी शिवदुर्ग टीम बरोबर मदतनीस म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अभिषेक कुलकर्णी, भिवाजी शिंदे, उमेश तळेगावकर, ब्रिंदा अनिश गणात्रा, समीर राऊळ, हर्षदीप पवार, परेश बडेकर, सनी दळवी, दत्ता येवले, देविदास कडु, आदित्य व्यास, जय घोणे, नितीन दुर्गे, सुभाष डेनकर, निवृत्ती दुडे, राजेंद्र शिंदे, अजय राऊत, डॉ रुपेश खेडेकर, दिव्येश मुनी आणि लोणावळा नगरपालिका यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version