वरदविनायकाच्या दर्शनासाठी लांबलचक रांगा

। रसायनी । वार्ताहर ।

अष्टविनायक क्षेत्रातील वरदविनायक हे देवस्थान खालापूर तालुक्यातील महड येथे आहे. यावेळी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सुमारे दीड वर्षांनी हा अंगार योग आला असल्याने गणेश भक्तांनी बाप्पाच्या दर्शनाचा योग साधला होता.

मध्य रात्री गणेशाची विधिवत पूजा संपन्न झाल्यावर रात्री एक वाजल्या पासून भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते. सकाळी आठ आठवाजेपर्यंत एक किमी पर्यंत हि रांग वाढत गेली. यावेळी गणपती मंदिर परिसरात सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. भक्तांचे लक्ष वेधणारी ही रांगोळी रोशन पाटील, योगेश डाकी, मिताली सुर्वे, शुभम कुमरे, मधुरा भोईर, अमोल खानावकर, प्रणिता शिंदे, स्वप्निल गायकरे, मयूर हरड, संकेत पाटील, रोहित भोईर, हेतल म्हात्रे, रवींद्र चौधरी, ज्योती पाटील, मनोहर ठाकूर, पद्मिनी खाडे, यश पाटील, आरती घोरपडे, अजित मटकर आदी कलाकारांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली होती. येथील दर्शन रांग अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होती. मंदिर व्यवस्थापन यांनी भाविकांच्या सोयीसाठी योग्य नियोजन केले होते, तर पोलीस बंदोबस्त चोख होतो, यावेळी पार्किंग ची जागाही अपुरी पडत होती. कपाळी गंध लावणारे पैठण येथून आले होते. तर महिलांनी खरेदी विक्रीचा आनंद घेतला, यावेळी गावठी पालेभाजी, पडवळ, शिराळी, काकडी, घोसाळी याही भाज्यांची आवक वाढली होती.

Exit mobile version