ढिगाऱ्यात डोळे लावून आई-बाबांचा चेहरा शोधतोय; मुलाची भावनिक व्यथा

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
दररोज गावात आई बाबांना मोबाईलवरून विचारपूस करणाऱ्या भावेश मालूसरे याचा नेटवर्क नसल्याने दोन दिवसांपूर्वी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर बोलणेही झाले नाही. आणि कानावर आली ती दरड कोसळल्याची बातमी. त्यामुळे आई बाबांचा शोध घ्यायला थेट तळीये गाव गाठले. पण मातीच्या ढिगाऱ्याखाली आई बाबा गायब झाल्याची बातमी समोर आली.

दोन दिवसांपूर्वी आई बाबांजवळ बोलणे झाले होते. आज ते कुठे आहेत, याची कल्पना ही करवत नाही. येथे पोहचल्यावर सर्व परिस्थिती अंगावर काटे आणणारी आहे. कोणीही व्यवस्थित माहिती देत नाही. पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. आई, बाबांसोबत, चुलत भाऊ, वहिनी देखील बेपत्ता असून त्यांचा शोध लागेल या आशेवर ढिगाऱ्यात डोळे लावून असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version