| पनवेल | वार्ताहर |
दोन महिलांच्या अंगावरील तब्बल सव्वा दोन लाखांचे दागिने सोनसाखळी चोरांनी चोरून नेल्याची घटना खांदा कॉलनी आणि खारघरमध्ये घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खांदा कॉलनी सेक्टर-14 मध्ये राहणाऱ्या रत्नप्रभा ठाकूर यांनी काही महिन्यांपूर्वीच नवीन मंगळसूत्र खरेदी केले होते. नवरात्री उत्सव सुरु होणार असल्याने रत्नप्रभा यांनी त्यादिवशी मंगळसूत्र घालून बाजारात गेल्या होत्या. मात्र, घरी परतत असताना त्यांच्या पाठीमागून भरधाव मोटारसायकलवरून आलेल्या लुटारूंनी रत्नप्रभा यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून खांदा कॉलनी सिग्नलच्या दिशेने पलायन केले. या प्रकारानंतर रत्नप्रभा यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तर याच घटनेच्या दोन दिवसानंतर स्कुटीवरून आलेल्या एका लुटारूने खारघरमधील निफ्ट कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका 24 वर्षीय विद्यार्थिनीच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन खेचून पलायन केले. याबाबत खांदेश्वर तसेच खारघर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलांच्या गळ्यातील सव्वा दोन लाखांचे दागिन्यांची लूट
