भारतात 422 अब्ज मिनिटे पाहिला गेला टीव्ही
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतातील 2023 च्या पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषकाने स्टेडियममधील उपस्थिती आणि प्रसारण दर्शकांचे विक्रम मोडीत काढले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 2015 च्या विश्वचषकादरम्यान 1,016,420 प्रेक्षकांच्या मागील विक्रमाला मागे टाकून भारतातील मैदानांवर एकूण 1,250,307 प्रेक्षकांनी 48 सामने पाहिले, असे आयसीसीने म्हटले आहे. इंग्लंडमधील 2019 विश्वचषक 7,52,000 प्रेक्षकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
डिस्ने स्टारने सांगितले की, भारतातील लीनियर टेलिव्हिजन प्रेक्षकसंख्या अर्ध्या अब्जाहून अधिक झाली असून, स्पर्धेच्या सहा आठवड्यांमध्ये विश्वचषकासाठी 518 चाहत्यांनी स्पर्धेतील सामन्यांचा आनंद लुटला . भारतातील ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलच्या आकडेवारीनुसार 422 अब्ज मिनिटं इतका कालावधी प्रेक्षकांनी विश्वचषकाचे सामने पाहिले आहेत, ज्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विश्वविक्रम बनला आहे. भारत ऑस्ट्रेलिया सामना 300 दशलक्ष चाहत्यांनी पाहिला. सामन्यादरम्यान एकाक्षणी 130 दशलक्ष चाहते अंतिम लढत पाहत होते. टीव्हीवर सर्वाधिक पाहिला गेलेला क्रिकेट सामना असं डिस्ने स्टारने भारत-ऑस्ट्रेलिया लढतीच्या प्रेक्षकसंख्येबाबत म्हटलं आहे. डिस्ने हॉटस्टार अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्मवरही विश्वचषकाने नवे विक्रम प्रस्थापित केले. हॉटस्टारवर 59 दशलक्ष चाहत्यांनी विश्वचषक पाहणं पसंत केलं.







