लोटे ‘एमआयडीसी’तील कंपनीला भीषण आग

। खेड । प्रतिनिधी ।
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रिवी ऑरगॅनिक कंपनीचे गोडाऊनला रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. अचानक लागलेल्या आगीत कंपनीचे गोडावून भक्ष्यस्थानी पडले. कंपनीला लागणारा कच्चामाल या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. या कंपनीचा मुख्य प्लाट आणि अशोका सीएनजी गँस प्लांट जवळ असल्याने भीती मात्र कायम होती. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कंपनीसाठी लागणारा कच्च्या मालासह विविध प्रकारचे सॉलव्हटची गोडाऊनमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. हे साँलव्हंट अत्यंत ज्वालाग्राही असल्याने आगीने क्षणात रौद्र रुप धारण केले. एमआयडीसीचे दोन अग्निशामक बंब आणि चिपळून, खेड नगरपालिकेचे अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आग लागली तेव्हा गोडाउन मध्ये कोणी नव्हते यामुळे कोणाला दुखापत झाली नाही. मात्र मंगेश पवार नामक एका कामगाराला आगीतून पसरलेल्या वायुची बाधा झाली आहे. प्रिवी आँरगँनिक कंपनी आणि गोडावूनमध्ये सुमारे चाळीस मीटरचे अंतर आहे. ज्यावेळी आग लागली तेव्हा कंपनीमध्ये रात्रपाळीचे कामगार काम करीत होते. अग्निशमन दलाच्या जवानासह कंपनी व्यवस्थापनाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात सुमारे अडीच-तीन तासानंतर यश आले आहे. अशी माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे.

Exit mobile version