संघर्षमय परिस्थितीतही लव्हलिनाची यशस्वी कामगिरी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वडिलांनी मिठाई गुंडाळून आणलेल्या पेपरने तिचं आयुष्य बदललं; भारतासाठी पदक जिंकणार्‍या भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनला प्रवास संघर्षमय असाच राहिला आहे.महिलांच्या 69 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लवलिनाने कास्य पदक जिंकले आहे. लव्हलिना ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची दुसरी महिला बॉक्सिंगपटू बनली आहे. यापूर्वी हा पराक्रम मेरी कोम हिने केला आहे.

लव्हलिना ही ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी पहिली महिला बॉक्सिंगपटू आहे. यापूर्वी आसाममधील शिवा थापा हे ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळले होते. मागील वर्षी लव्हलिनाला करोनाची लागण झाल्यानंतर तिला सरावासाठी यूरोप दौर्‍यावर जाता आलं नाही. त्यामुळेच लव्हलिनाने भारतामध्ये राहूनच सराव केला. म्हणूनच तिचा हा विजय अधिक महत्वाचा आहे. लव्हलिनाचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास फार खडतर होता. कोणत्याही लहान शहरामधून किंवा गावातून आलेल्या खेळाडूंप्रमाणे तिलाही आर्थिक संकटांचा आणि समाजातून होणार्‍या विरोधाचा सामना करावा लागला. लव्हलिनाचा जन्म आसाममधील गोलाघाट जिल्ह्यामध्ये 2 ऑक्टोबर 1997 साली झाला. लव्हलिनाचे वडील टिकेन हे एक छोटे व्यापारी होते. त्यांनी आपल्या मुलीची बॉक्सिंग सारख्या क्षेत्रात करियर करण्याची हौस पूर्ण करण्यासाठी बराच संघर्ष केला. लव्हलिनानं ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकताच गावात रस्त्याचं काम सुरू केले आहे.त्यासाठी तातडीनं प्रशासन लागलं कामाला लव्हलिनाच्या घराजवळ जाणारा कच्चा मार्ग व्यवस्थित करण्याचं काम सुरु झालं आहे.

लव्हलिना टोक्योतून पदक जिंकून येईपर्यंत रस्ता दुरूस्त होईल. पावसाळा संपल्यानंतर हा रस्ता पक्का केला जाईल,असं भाजपा आमदार बिस्वजीत फुकान यांनी सांगितलं होतं. मुसळधार पावसामुळे तिच्या घराजवळ जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता. राज्याचं बांधकाम विभाग हा रस्ता व्यवस्थित करण्यासाठी कामाला लागलं आहे.

Exit mobile version