हिराजी गणा पाटील यांचे निधन
| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील सांबरी गावचे शेकापचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते, स्व.प्रभाकर पाटील यांचे विश्वासू सहकारी हिराजी गणा पाटील (95 वर्षे) यांचे निधन झाले. कुर्डूसचेे माजी सरपंच संदीप पाटील यांचे वडील होत. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच आ.जयंत पाटील, माजी आ.पंडित पाटील, जि.प. सदस्या भावना पाटील, जि.प.सदस्य आस्वाद पाटील,चित्रा पाटील,पं स सभापती प्रमोद ठाकूर ,सदस्या रचना म्हात्रे,ग्रा,पं. सदस्य विजय पाटील आदींनी पाटील परिवाराचे सांत्वन केले. दशक्रिया विधी 2 मार्च तर दहावा तर तेरावे 5 मार्च 2022 रोजी राहत्या घरी होणार आहे. त्यांच्या पत्नी 2 मुले, मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.