I पनवेल I प्रतिनिधी I
शेतकरी कामगार पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता हीच लाल बावट्याची ताकद आहे. कितीही संकटे आली तरी त्यावर मात करून पुढे जाणे ही शेकापची नीती आहे असे शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. कामोठे येथे शेतकरी कामगार पक्ष आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आयोजित केलेल्या कामोठे महोत्सवात बोलत होत्या.
या कामोठे महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, कामोठे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक जाधव आदी उपस्थित होते. कामोठे महोत्सव हा बुधवार 23फेब्रुवारी 2022सुरु झाला असून त्याची सांगता रविवारी 6मार्च 2022होणार आहे या मध्ये दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत आहेत सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी मा नगरसेवक प्रमोद भगत, मा नगरसेवक शंकरशेठ म्हात्रे, पंडित गोवारी, कुणाल भेंडे, सुरेश खरात भालचंद्र म्हात्रे आदी विशेष मेहनत घेत आहेत.
आम्ही अलिबागमध्ये मुलींच्या शिक्षणाचा विचार करून मुलींना शाळेत जाण्यासाठी 4000 सायकलचे वाटप केले तसेच पूरग्रस्तांना भरीव मदत केली. पनवेल महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीत मी पनवेल मध्ये शेतकरी कामगार पक्षाची महिला आघाडी सक्षम करण्यासाठी मेहनत घेणार.
चित्रलेखा पाटील, शेकाप आघाडी प्रमुख