LPG सिलिंडर पुन्हा महागला

। नवी दिल्ली। वृत्तसंस्था ।
रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा आता सामान्यांना बसू लागल्या आहेत. या युध्दाच्या दरम्यान मंगळवारी 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले. सिलिंडरचे दर 105 रुपयांनी वाढले आहेत. व्यावसायिक सिलिंडरमध्ये ही वाढ करण्यात आली असून 7 मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलिंडरही महाग होण्याची शक्यता आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ
यावेळीही व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 19 किलोचा LPG सिलेंडर 1 मार्चपासून दिल्लीत 1907 रुपयांऐवजी 2012, कोलकात्यात 1987 ऐवजी 2095 तर मुंबईत 1857 रुपयांवरून 1963 रुपयांना मिळणार आहे.

निवडणुकीनंतर घरगुती सिलिंडर 100 ते 200 रुपयांनी महागणार?
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत अनेक महिन्यांपासून दिलासा मिळाला आहे. 7 मार्चनंतर गॅसच्या दरात प्रति सिलेंडर 100 ते 200 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version