कुणाल पांड्याची अष्टपैलू कामगिरी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कृणाल पांड्याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने सनराजयर्स हैदराबादचा पाच विकेटने पराभव केला. लखनऊच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना 121 धावांपर्यंत रोखले, त्यानंतर फलंदाजांनी हे आव्हान सहज पार केले. लखनऊने हैदराबादचा पाच विकेट आणि 24 चेंडू राखून पराभव केला.
या विजयात कृणाल पांड्याने आधी गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली, त्यानंतर फलंदाजीत मोलाचे योगदान दिले. लखनऊचा तीन सामन्यांतील हा दुसरा विजय होय. तर, हैदराबादला सलग दुसर्या पराभवाचा सामना करावा लागला. एडन मार्करमचे नेतृत्वही हैदराबादला विजय मिळवून देऊ शकले नाही. हैदराबाद, दिल्ली आणि मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.
हैदराबाद विरोधात कृणाल पांड्या याने अष्टपैलू कामगिरी केली. गोलंदाजी करताना कृणाल पांड्याने चार षटकात फक्त 18 धावा खर्च करत तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. तर फलंदाजीत त्याने 34 धावांचे योगदान दिले. कृणाल पांड्याने 23 चेंडूत एक षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 34 धावांचे योगदान दिले.
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या हैदराबादच्या फिरकीपुढे हैदराबादचे फलंदाजांची दाणादाण उडाली. निर्धारित 20 षटकात हैदराबादने 8 गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा केल्या. हैदराबादच्या तीन फिरकी गोलंदाजांनी हैदराबादच्या सहा गड्यांना तंबूत पाठवले. कृणाल पांड्या, अमित मिश्रा आणि रवि बिश्नोई या फिरकी त्रिकुटासमोर हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली.
कृणाल पांड्या, रवि बिश्नोई आणि अमित मिश्रा या फिरकी त्रिकुटापुढे हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली. क्रृणाल पांड्याने तीन विकेट घेतल्या. तर अमित मिश्राने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. रवि बिश्नोई याने एक विकेट घेतली. या तिन्ही फंलदाजांनी धावाही रोखल्या. कृणाल पांड्याने चार षटकात अवघ्या 18 धावा खर्च केल्या. तर रवि बिश्नोई याने फक्त 16 धावा दिल्या. अमित मिश्रा याने चार षटकात 23 धावा दिल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. मयंक अग्रवाल अवघ्या 8 धावा काढून तंबूत परतला. एडन मार्करम याला खातेही उघडता आले नाही. हॅरी ब्रूक 3, वॉशिंगटन सूंदर 16,आदिल रशीद 4, अमरान मलिक शून्य.. यांना मोठी खेळी करता आली नाही. लखनौच्या गोलंदाजीसमोर फलंदाजींनी नांगी टाकली.
एकीकडे फंलदाज नांग्या टाकत असताना हैदराबादच्या अब्लुद समद, राहुल त्रिपाठी आणि अनमोलप्रीत सिंह यांनी संघर्ष केला. या तीन फंलदाजांनी धावा केल्यामुळे हैदराबादची लाज वाचली. अनमोलप्रीत याने 26 चेंडूत 31 धावांची खेळी केली. तर राहुल त्रिपाठी याने 41 चेंडूत 34 धावा जोडल्या. अब्दु समद याने अखेरच्या षटकात फटकेबाजी केल्यामुळे हैदराबादचा संघ 100 च्या पार केला. अब्लुद समद याने 10 चेंडूत 21 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षटकार लगावले. लखनौची गोलंदाजी इतकी भेदक होती की हैदराबादच्या फंलदाजांना फक्त 20 षटकात तीन षटकार लगावता आले. तर फक्त 10 चौकार त्यांना मारता आले.