कर्जतमध्ये लम्पिंचा दुसरा बळी

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात जनावरांमध्ये आढळून येत असलेला लम्पि सदृश रुग्णात वाढ होत आहे. त्यासाठी मुंबई येथील पशू वैद्यकीय महाविद्यालयमधील तज्ञ डॉक्टरांचे पथक पोहचले तरी देखील दुसरा बळी आजाराने घेतला आहे. पिंपलोळी गावातील दुसरा बळी गेल्याने शेतकरी वर्गात भीतीचे सावट पसरले आहे.

तालुक्यात लंपी आजाराचे बाधित जनावरे आढळून आल्यानंतर पाच ठिकाणी बाधित क्षेत्र जाहीर केले. त्या ठिकाणी आसपासच्या पाच किलोमीटर परिघातील सर्व जनावरे यांचे लसीकरण पशू वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. पिंपलोळी गावातील दामू पाटील यांचे तीन वर्षीय गोवांशिय पशूचा सोमवार (26) रोजी मृत्यू झाला आहे.

तालुक्यात लम्पि सदृश जनावरे आढळून आल्यानंतर जिल्ह्याच्या पशुधन विभागाने तालुक्यातील पाच क्षेत्र निश्‍चित करून तेथे जनावरे यांचे लसीकरण सुरू केले होते. त्यानंतर 15 दिवसांनी आणखी एक जनावरे याचा मृत्यू झाला आहे. त्या मृत जनावराचा पंचनामा या विभागाचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. कैलश बागुल यांनी केला त्यावेळी ग्रामविकास अधिकारी एम. डी. थोरवे, महसूल तलाठी उमाकांत गुरुमुर्ती, परशुराम सोनावळे,कैलाश सोनावळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version