रायगडमध्ये जनावरांना लंपीचा धोका ?

मुरूडसह आता अलिबागमध्ये लंपीचा प्रादुर्भाव

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पशुधनावरील आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील दोन महिन्यापूर्वी पशुसंवर्धन विभागाने लंपीचे लसीकरण केले. तरीदेखील जिल्ह्यातील अनेक भागात लंपीचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. मुरूडसह आता अलिबागमध्येही त्याची लागण अनेक जनावरांना होऊन बैल दगावल्याची माहिती समोर येत आहे. परंतु या घटनेबाबत पशुसंवर्धन विभाग अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे.

पशुधनावरील मानसिक व शारिरीक शक्ती कमकूवत होते. लंपीचा प्रादुर्भाव असलेल्या पशुधनांच्या अंगावर व डोळ्यावर फोड येतात. त्यांना अंधत्वाचा धोका निर्माण होतो. ही समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यात मागील दोन महिन्यापूर्वी लसीकरण करण्यात आले. लाखो जनावरांचे लसीकरण्यात आले. या लसीकरणातून लंपीसारखा रोग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु काही पशुधनांचे लसीकरण झाले नसल्याचा फटका जनावरांना बसला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरूड या ठिकाणी लंपीचा प्रादुर्भाव निर्माण झाला असताना आता अलिबाग तालुक्यातही त्याचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कार्ले व खंडाळे येथील तीन जनावरांचा मृत्यू लंपीमुळे झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. मात्र या बाबत पशुसंवर्धन विभाग अनभिज्ञ असल्याची माहिती समोर येत आहे. एका बाजूला पशुधन वाढविण्यासाठी वेगवेगळ्या योजना व अभियान राबविले जात असताना पशुधनांना लंपीचा धोका निर्माण झाल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांना नसणे ही मोठी शोकांतिका व्यक्त करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये लंपी आजाराला रोखण्यासाठी 98 टक्के लसीकरण पुर्ण झाले आहेत. काही शेतकर्‍यांनी लसीकरण करून घेतले नाही. तर काही शेतकर्‍यांनी बाहेरून पशुधन आणून देखील लसीकरण करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कदाचित लंपीचे रुग्ण सापडले असावेत. जिल्ह्यात धोकादायक परिस्थिती नाही. परंतु अलिबगमध्ये मयत झालेल्या जनावरांची माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.

डॉ. सचिन देशपांडे – सहाय्यक आयुक्त
पशुसंवर्धन विभाग,
Exit mobile version