लोकसभेसाठी एम-3 बनावटीचे ईव्हीएम यंत्र

| रायगड | खास प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दुसरीकडे निवडणूक विभागही कामाला लागला आहे. 2019 साली पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच मतदान यंत्रबरोबरच व्हीव्हीपॅट यंत्रचा वापर करण्यात आला होता. भारतीय निवडणूक आयोगाने 2024 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एम-3 बनावटीचे ईव्हीएम यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

रायगड जिल्ह्यात 2694 मतदान केंद्रे आहेत. त्यानुसार रायगड लोकसभेसाठी तब्बल सात हजार 52 मतदान यंत्र, चार हजार 45 कंट्रोल युनिट आणि चार हजार 222 व्हीव्हीपॅट यंत्र प्राप्त झाले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी ‌‘कृषीवल’शी बोलताना दिली.

Exit mobile version