कणकवली ‘कोमसाप’च्या शाखाध्यक्षपदी माधव कदम

कार्यवाहपदी सिद्धेश खटावकर यांची निवड

। कणकवली । वृत्तसंस्था ।

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, लेखक माधव कदम यांची तर कार्यवाहपदी सिद्धेश खटावकर यांची निवड करण्यात आली.

‘कोमसाप’चे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा समन्वयक रूजारिओ पिंटो, सुरेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील हॉटेल अप्पर डेकच्या सभागृहात आयोजित बैठकीत नूतन कार्यकारी मंडळाची सर्वानुमते निवड केली. कणकवली मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सुचनेनुसार येथील साहित्यिक, पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची बैठक झाली. कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके अध्यक्षस्थानी होते. या वेळी मसके यांनी सर्वानुमते कणकवली शाखेच्या नूतन कार्यकारी मंडळाची निवड केली. यात तालुका शाखाध्यक्ष माधव कदम, जिल्हा प्रतिनिधी आर्किटेक्ट, उद्योजक संदीप वालावलकर, उपाध्यक्ष राजस रेगे, खजिनदार डॉ. सतीश कामत, कार्यवाह सिद्धेश खटावकर, कार्यकारी मंडळ सदस्य गणेश जेठे, महेश काणेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अशोक करंबेळकर, चिराग बांदेकर, अमर पवार, रिमा भोसले, अभय खडपकर, धाकू तानावडे, नीलेश ठाकूर, लक्ष्मण नारकर, गीतांजली कुलकर्णी यांची निवड झाली. कणकवली शाखेच्या नूतन कार्यकारी मंडळाचे कोमसापचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक आणि डॉ. प्रदिप ढवळ यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version