। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वरसोली खंडाळ्कर आळी येथील मधुकर दादाभाई घरत यांचे 16 जानेवारी रोजी निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वरसोली येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते भजन रसिक होते. साई सिद्धी भजन मंडळाचे बुवा म्हणून अनेक वर्ष त्यांनी सेवा बजावली.
मुलगा व मुलगी असा त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. मुलाप्रमाणे मुलींनी आपल्या वडिलांच्या सुख दु:खात कायम सहभागी होऊन वडिलांची शेवटपर्यंत सेवा केली तर धाकट्या मुलीने मुख अग्नी दिला. त्यांच्या पश्चात पत्नी साधना घरत, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
दशक्रिया विधी मंगळवारी (दि.25) वरसोली येथे करण्यात येणार आहेत. मनमिळावू स्वभावाचे मधुकर घरत यांच्या निधनाची बातमी समजताच वरसोली ग्रामपंचायत सदस्य सुरेश घरत, अभिजित कवळे, राजू घरत, नरेंद्र घरत, अनंत पाटील, दिलीप पाटील, अभिजित विरकूड, अमोल नाईक, साई सिद्धी तरुण मित्र मंडळ सदस्य आणि ग्रामस्थांनी त्यांच्या अंत्ययात्रेत उपस्थिती दर्शविली.