जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे अलिबागेत जादुचे प्रयोग

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रख्यात जादुगार जितेंद्र रघुवीर यांचे अलिबाग येथे जादुचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर अलिबागमधील मेघा चित्रमंदिर येथे ख्रिसमस सुट्टीनिमित्त शनिवार (दि.25) आणि रविवारी (दि.26) सायंकाळी सात वाजता हे जादुचे प्रयोग सादर करणार आहेत. शनिवारी (दि.25) सायंकाळी साडेपाच वाजता जितेंद्र रघुवीर हे डोळ्यावरुन पट्टी बांधून अलिबाग बाजारपेठेतून मोटारसायकलवरुन फिरणार आहेत.

या प्रयोगासाठी विद्यार्थ्यांना तिकिटामागे 100 रुपयांची खास सवलत दिली जाणार आहे. या शोसाठी 500, 400, 300 रुपये अशी तिकीटे ठेवण्यात आली आहेत. प्रेक्षकांनी अधिक माहितीसाठी संयोजक संदीप गोठीवरेकर- 9527686100 येथे संपर्क साधावा. तसेच या कार्यक्रमाची तिकीट विक्री विनायक एजन्सी, बालाजी नाका, अलिबाग येथे सुरु आहे.

Exit mobile version