पालीत महास्वच्छता अभियान यशस्वी

| पाली/गोमाशी । वार्ताहर ।
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी पूर्तीनिमित्त सुधागड तालुक्यातील पाली या ठिकाणी तसेच महाराष्ट्रासह देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

पाली येथे घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात बल्लाळेश्‍वर मंदिर परिसर, शासकीय कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र,बसस्थानक, तहसील कार्यालय, न्यायालय, पोलीस स्टेशन, कृषी खाते व वन विभाग, बांधकाम विभाग व शासकीय विश्रामगृह, पंचायत समिती, पाली बाजारपेठ, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, हटाळेश्‍वर चौक परिसराची श्रीसदस्यांनी स्वच्छता केली. या अभियानात 1300 श्रीसदस्यांनी सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी केले. या वेळी 17.65 टन सुका कचरा आणि 15.2 टन कचरा जमा करून ट्रॅक्टर, टेम्पो यांच्या माध्यमातून डंपिंग मैदानात साठविण्यात आला.

जन्मशताब्दी महास्वच्छता अभियानामध्ये सहभागी करून घेतल्यामुळे आम्ही मंडळी प्रतिष्ठानला धन्यवाद देतो. – अरीफ मणियार, उपनगराध्यक्ष पाली

प्रतिष्ठानमार्फत समाजप्रबोधन, स्वच्छता, व्यसनमुक्ती असे अनेक स्तुत्य उपक्रम हाती घेऊन श्री सदस्य मोठ्या उस्फुर्तपणे निस्वार्थ कार्य करीत असतात. – गद्रे, अध्यक्ष श्री बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्ट

Exit mobile version