हजारो टन कचरा गोळा, रस्ते चकाचक
। अलिबाग । वार्ताहर ।
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग यांच्या वतीने भारताचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात आली. अभियानात शासकीय कार्यालये, रुग्णालये, स्मशानभूमी आणि रुग्णालयांचा समावेश होता. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत अभियान पार पडले. या अभियानात हजारो श्रीसदस्यांनी हातात ग्लोज, मास्कचा वापर करत अभियान यशस्वी केले.

कर्जत नेरळ परिसरात शेकडो टन गोळा
थोर निरुपणकार डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून कर्जत आणि नेरळ येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दोन्ही ठिकाणी मिळून तब्बल चार हजार श्री सदस्य आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून कचरा गोळा केला. दरम्यान श्री सदस्यांनी गोळा केलेला कचरा आणि प्लास्टिक हे टन असून या दोन्ही गावातील कचर्याचे निर्मूलन करण्यात श्री सदस्य यशस्वी ठरले.नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचे हस्ते स्वच्छ्ता मोहिमेला सुरुवात झाली. कर्जत शहरातील दोन श्री सदस्य बैठका यांच्या जोडीला पिंगळस,पाथरज,खांडस,पोसरी,मुद्रे दहिवली, खांडपे येथील श्री सदस्य श्रमदान करण्यासाठी उतरले होते.
सर्व कचरा शहरातील त्या त्या ठिकाणवरून पालिकेचे डंपर आणि खासगी डंपर माध्यमातून कचरा डेपो येथे नेवून ठेवण्यात आला.पालिकेच्या या कचरा डेपो येथे सर्व प्रकारचा कचरा यांच्यावर प्रक्रिया करण्याचे यंत्रणा असल्याने सर्व कचर्यावर प्रक्रिया केली जाईल आणि शहराची शून्य कचरा शहर अशी ओळख टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल असा विश्वास पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी व्यक्त केला आहे.ही स्वच्छता अभियान मोहीम शहरातील रुग्णालय,सर्व शासकीय कार्यालये,तसेच शहरातील बाजारपेठ, भिसेगाव,गुंडगे,मुद्रे, दहीवली,आक्रुले या भागात राबविण्यात आली.
नेरळ येथे सरपंच उषा पारधी आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांचे हस्ते स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर किमान दीड हजार श्री सदस्य यांनी नेरळ गावातील सरकारी दवाखाना,हुतात्मा चौक,तसेच मातोश्री नगर,गंगानगर,निर्माण नगरी,पाडा,टेपआळी,ब्राम्हण आळी,कुंभार आळी,पायार माळ,चिंच आळी,राजेंद्र गुरूनगर,श्री शिवाजी महाराज जिजाऊ तलाव,स्टेशन आळी,खांदा,मोहाची वाडी,आनंद वाडी,टपाल वाडी,या भागात स्वछत्ता मोहीम राबविण्यात आली.त्यासाठी नेरळ मधील दोन श्री सदस्य बैठक तसेच परिसरातील तळवडे, कोळीवली,धामोते, पोशिर,वारे आणि मुरबाड तालुक्यातील पाटगाव येथील श्री सदस्य सहभागी झाले होते.

तळा शहरात महास्वच्छता
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रेवदंडातर्फे तळे शहरात 1 मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले असून तळा शहर स्वच्छ करण्यात आले आहे. याप्रसंगी तहसीलदार अण्णाप्पा कनशेट्टी, वैद्यकीय अधिकारी डॉ. होमसांगळे, पुरुषोत्तम मुळे यांचे उपस्थितीत स्वच्छतेची सुरुवात करण्यात आली. स्वच्छता अभियान गोरेगाव, निजामपूर ग्रामपंचायत तर माणगाव-तळा नगरपंचायत हद्द, तळा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन, कार्यालय, बाजारपेठ, दोन्ही मोहल्ले, नगरपंचायत हद्दीमध्ये रस्ते, रामेश्वर मंदिर इत्यादी ठिकाणी स्वच्छता करणेत आली. जवळपास पाचशे ते साडेपाचशे श्रीसदस्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कुडेकर, दीपक ठाकूर, संदीप जामकर, रवींद्र मुंढे, राजीव खांडेकर, यशवंत मोंडे, संतोष ठसाळ यांचेसह श्री सदस्यांनी परिश्रम घेतले.

पनवेल स्वच्छता मोहीम
थोर निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. नाना साहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी निमित्त बुधवार (1) आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र भर स्वचछता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने पनवेल शहरात देखील श्री सदस्यांनी उपजिल्हा रुग्णालय, उड्डाणपुल, तलाव क्षेत्र, शहरातील सर्व स्वच्छ करण्यात आले आहेत. या मोहिमेत पनवेल, मार्केट परिसर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील साधारण चार हजार 193 श्री सदस्यांनी स्वचछता मोहिमेत सहभाग घेतला होता. यावेळी शेकडे टन कचरा जमा करण्यात आला. या स्वच्छता अभियानाला लागणारे संपूर्ण साहित्य डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्याकडून देण्यात आले. या स्वछता मोहिमेचे पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी विशेष कौतुक करत या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

वाघ्रणला जन्म शताब्दी साजरी
वाघ्रणला सेवाश्रम सामाजिक विकास सेवा संस्था वाघ्रण रायगडच्या वतीने बुधवार(1 ) थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमत व श्री सदगुरु चरीत्र ग्रथ आणि श्री समर्थ संत रामदास स्वामी व छत्रपती म शिवरायां च्या प्रतिमा पूजनाने झाली. या वेळी सेवाश्रम संस्थेचे अध्यक्ष दिपक पाटील यांनी प्रास्तावीक करताना डॉ. नानासाहेबांच्या कार्याचा आढावा घेताना सविस्तर माहीती म्हणून शैक्षणिक व्यसनमुक्ती वृक्षारोपण आरोग्य व अंधश्रद्धा निर्मुलन आदीवर लक्ष केंद्रीत केले. यावेळी पाटील, महेंद्र म्हात्रे, रुपेश पाटील, विलास पाटील, विनया म्हात्रे, कांचन पाटील, विलास पाटील, किशोर पाटील उपस्थित होते. दिपक पाटील आभार मानून सांगता केली.

मुरुड शहरचे रस्ते चकाचक
महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्ये महास्वछता अभियान तहसील कार्यालयासमोर तहशीदार रोहन शिंदे यांनी श्रीफळ वाढून मुख्यधकारी पंकज भुसे यांनी साहित्य पूजन करून करण्यात . आली. यावेळी माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील, युगा ठाकूर, अविनाश दांडेकर, महेश मानकर, महेंद्र चौलकर, प्रवीण बैकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यासाठी मुरुडतालुक्यातील 737 श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. 25 टन ओला कचरा, व तीन टन सुखा कचरा गोळा करून डम्पिंग ग्राउंड टाकण्यात आले.

म्हसळयात स्वच्छतेचा जागर
महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त म्हसळ्यात स्वच्छता मोहीम करण्यात आली. हि स्वच्छता मोहीम डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे रेवदंडा यांच्या मार्फत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ. सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम करण्यात आली. प्रतिष्ठानाचे श्री सदस्य यांनी म्हसळा शहरातील शासकिये कार्यालये तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन, सर्कल कार्यालय,ग्रामीण रुग्णालय परिसर, बस स्थानक परिसर, विश्रामगृह, पंचायत समिती कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक वाचनालय,पाभरे चेक पोस्ट ते पेट्रोल पंपा पर्यंत व शहरातील मुख्य रस्ता,कन्या शाळा, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया परिसर, धावीरदेव शंकर मंदिर, गणेश मंदिर, राधा कृष्ण मंदिर, पानपोई, अशा विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
यावेळी तहसिलदार समीर घारे, गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, नगराध्यक्ष अहसल कादिरी, डॉ. महेश मेहता, डॉ. प्रशांत गायकवाड, राखी करंबे, अंजुमन इस्लाम नसीर मिठागरे, नंदकुमार सावंत, शशिकांत शिर्के, उदयकुमार कळस, अजय करंबे, नगर पंचायतीचे सर्व कर्मचारी विविध संघटनेचे सर्व सदस्य प्रतिष्ठानचे सदस्य स्वच्छतेसाठी हजर होते.

उरणमध्ये १८७६ श्री सदस्यांचा सहभाग
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने उरण येथे स्वच्छतेची मोहीम आखण्यात आली होती. यावेळी उरण शहर परिसर स्वच्छ करण्यासाठी अनेक श्री सदस्यांनी आपल्या हातात झाडू घेऊन, परिसर स्वच्छ केला. यात पंचायत समिती कार्यालय परिसर, इंदिरा गांधी रुग्णालय परिसर, न्यायालय परिसर, तहसील कार्यालय परिसर, नगर परिषद परिसर, नगर परिषदेच्या शाळेचा परिसर, वीर सावरकर मैदान परिसर, आयटीआय परिसर,बस स्टॅन्ड परिसर, ओ एन जी सी परिसर आणि शहरातील रस्ते आदी भागात श्री सदस्यांनी पुढाकार घेऊन ही स्वच्छता मोहीम आखली होती. यात साधारणता टन ओला कचरा आणि 23.16 टन सुका कचरा उचलून परिसर स्वच्छ केला.