| माणगाव | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. तापमानाचा पारा 37 अंशपार झाला आहे. वाढणार्या उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. या वाढत्या तापमानावर माठातील पाणी हे सर्वसामान्य व व्याकूळलेल्या नागरिकांची तहान भागवीत असून या माठाला मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक व्यावसायिकांचे माठ थोडे महाग असून राजस्थानहून येणारे माठा हे किमतीत किमतीला थोडेफार कमी असून ते खिशाला परवडणारे आहेत. त्यातच रंगीबेरंगी नक्षीकाम केलेल्या माठाची ग्राहकांना चांगलीच भुरळ पडत असून या माठावर ग्राहक फिदा होत आहेत.
माणगावमध्ये गेली अनेक वर्षापासून मदन राययादव व त्याचा मुलगा हिरालाल राययादव हे पिता पुत्र मूळ बिहार येथील रहिवासी असून ते बाराही महिने नर्सरीतील पुणे येथून विविध रंगीबेरंगी तसेच आकर्षक विविध फुलझाडे, मोगरा, गुलाब, जास्वंद, रातराणी, चमेली, काकरा, यासह विविध पाम झाडाच्या जाती बोटल पाम, मोरपंखी, सायप्रेस, क्रिसमस, ऑफिस गुलाब, सदाफुली, चिनी गुलाब यासह अनेक विविध जाती इंडोअर, आऊटडोअर यासारखी झाडे विक्री करण्याचा व्यवसाय करतात. पावसाळा चार महिने व हिवाळा चार महिने असे एकूण आठ महिने नर्सरी रोपे आणून व्यवसाय करीत आहेत. ग्राहकांना परसबागेत तसेच घराच्या अवतीभोवती खिडक्या, दरवाजे समोर तसेच गॅलरीत ही झाडे लावून घर, बंगला, बिल्डींगच्या शोभेत भर पडतात.
लहान मोठया आकारात उपलब्ध असणारे हे माठ 80 रुपयापासून लहान माठ तर मोठा 100, 150, 200, 300, 400 रुपयापर्यंत विक्री केली जाते. सर्वसामान्य माणगावकारांच्या पसंतीस उतरणारे हे माठ फ्रीजमधील अतिथंड पाण्यापेक्षा नैसर्गिक व आरोग्यदायी आशा पाण्यासाठी माणगावकारांच्या पसंतीस उतरत आहेत. स्थानिक मडक्यांनाही बाजारात चांगली मागणी असली तरी आधुनिक जीवनशैलीमुळे कुंभारकाम करणारे कारागिर दुर्मिळ झाल्याने परराज्यातील माठ खरेदी करण्याशिवाय नागरिकांना दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही.
दरवर्षी उन्हाळ्यात माठ विक्रीसाठी आम्ही घेऊन येतो. उन्हाळा वाढल्याने माठ विक्री वाढली आहे. राजस्थान वरून हे माठ आणले आहेत. गेल्यावर्षी पेक्षा या वर्षी हि सरासरी तेवढ्याच किमती आहेत. किंमती स्थिर आहेत. नळ व रंगीबेरंगी नक्षीकाम असणार्या माठाला चांगली मागणी आहे.
हिरालाल राययादव, माठ विक्रेता, माणगांव