व्यासांच्या महाभारतामुळे गुगल ट्रेंड ब्रेकआउट

। सिद्धी भगत । अलिबाग ।
महाभारत हे महर्षी व्यासांनी रचलेले महाकाव्य आहे. या जगात शतकानुशतके जे घडले आहे, जे घडत आहे, ते सर्व महाभारतात आधीच नमुद केलेले आहे, असे म्हटले जाते. महाभारत हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. महाभारतात अनेक थोर व्यक्ती असल्या तरी कौरव, पांडव आणि श्रीकृष्ण हे महाभारताच्या केंद्रस्थानी आहेत. महाभारतातील प्रत्येक व्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाभारतात जय-पराजय झाले परंतु अंतिम विजय सत्याचा म्हणजेच पांडवांचा झाला. भगवान श्रीकृष्णांनी रणांगणावर अर्जुनाला सांगितलेली गीता हा महाभारतकथेचा गेरूमणी आहे.सध्या महाभारत हा ग्रंथ विकत घेण्यासाठी अनेकजण गुगलवर सर्च करत आहेत. म्हणुनच व्यासांचा महाभारत ग्रंथ हा गुगलवरचा ट्रेंडीग विषय बनला आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या महाभारत सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर हा चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. 2.6 करोड व्ह्युज मिळालेल्या या महाभारत सिनेमाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमा रिलीज होण्याची ओढ दिसुन येत आहे. या सिनेमामध्ये बॉलीवुडमधील मोठे कलाकर दिसुन येणार आहेत.

या महाभारत सिनेमाचे डायरेक्शन साउथचे डायरेक्टर एस. एस. राजामोउली यांनी केले आहे व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याच्या चर्चा रंगायला लागल्या आहेत.त्याचबरोबर वाचनाची आवड निर्माण होणार्‍यांचीही संख्या वाढताना दिसुन येत आहे. सध्या माहभारतावर आधारीत ग्रंथ ऑनलाईन विकत घेणार्‍यांचीही संख्या वाढताना दिसत आहे. ऑनलाईन माहभारत ग्रंथ पाहणार्‍यांमुळे गुगल ट्रेंडचा व्यासांचे महाभारत हा विषय ब्रेकआउट म्हणजेच सर्वात जास्त सर्च करणारा आजचा टॉपीक ठरला आहे.ऍमेझॉन या वेबसाईटवर अनेक वस्तु विक्रीसाठी रक्कमासहीत आपल्याला पाहायला मिळतात. यावर पुस्तकांचीही विक्री केली जाते. ऍमेझॉनवर माधव कानिटकर लिखीत महाभारत हा ग्रंथ विक्रीसाठी आहे. या ग्रंथाची किंमत 720 रूपये इतकी आहे. हा ग्रंथ मराठी भाषेत असुन या ग्रंथाची रेटींग 4.5 इतकही आहे. तसेच स्नॅपडील या वेबसाईटवर याच ग्रंथाची किंमत 724 इतकी आहे. भालबा केळकर लिखीत संपूर्ण महाभारत या ग्रंथाचे एकुण आठ खंड आहेत. ऍमेझॉन या वेबसाईटवर या ग्रंथाची किंमत 4800 इतकी आहे व मराठी हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर व्यासांचे महाभारत या ग्रंथाचे लेखक चित्रा कृष्णन या आहेत. ऍमेझॉन या वेबसाईटवर या ग्रंथाची किंमत 119 रूपये इतकी आहे तसेच 20 पानांचा हा ग्रंथ असुन याची रेटींग 4 स्टार इतकी आहे.

सरस्वती बूक कंपनी प्रकाशित सचित्र संपुर्ण महाभारत हा ग्रंथ ऍमेझॉन या वेबसाईटवर विक्रीसाठी 400 रूपयांना आहे. तसेच 5 स्टार रेटींग असलेला हा ग्रंथ मराठी भाषेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रियदर्शनि प्रकाश लिखीत महाभारत हा ग्रंथ ऍमेझॉन या वेबसाईटवर 150 रूपयांना विक्रीसाठी आहे. 4.5 स्टार रेटींग असलेल्या या ग्रंथात 160 पाने आहेत व मराठी भाषेत हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला आहे.ऍमेझॉन या वेबसाईटवर हाय रेटींग असलेल्या महाभारतावर आधारीत या ग्रंथांना महाराष्ट्रातून सर्वात जास्त सर्च केले जात आहे म्हणुनच व्यासांचे महाभारत हा विषय आजचा ट्रेंडीग विषय ठरला आहे.

Exit mobile version