। महाड । प्रतिनिधी ।
किल्ले रायगड कडे जाणाऱ्या वरंडोली गावाच्या हद्दीत दुचाकीस्वार आणि कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मुत्यू झाला आहे. राजेश बापू जाधव असे मुत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील वरंडोली गावाकडे दुचाकीस्वार राजेश जाधव हे आपल्या घराकडून महाडच्या दिशेने जात होते. दरम्यान अती वेगाने समोरून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला. दुचाकीस्वार हे वरडोली गावाच्या ग्रामपंचायतीचे शिपाई कामगार होते. या घटनेचा अधिक तपास महाड पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
Mahad Accident: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
