| महाड | वार्ताहर |
महाड एम.आय.डी.सी. मध्ये होत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघातांची संख्या वाढली असून, शनिवारी (दि.08) महाड आगाराची एसटी बस मांघरून वारंगीच्या दिशेला जात समोरून येणाऱ्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
खैरे येथील राजेंद्र जाधव हे मोटार सायकल वरून जात असताना समोरून येणाऱ्या महाड वारंगी एसटी बसची समोरासमोर धडक लागून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एस.टी.बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाला. असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या अपघातामध्ये दुचाकीस्वार राजेंद्र जाधव यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून, राजेंद्र जाधव हे खैरे गावचे पोलीस पाटील होते. मे महिन्यामध्ये मुलीचं लग्न आणि बापाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत.