| पनवेल | वार्ताहर |
भरधाव ट्रकने कारला दिलेल्या धडकेत एक जण जखमी झाल्याची घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वैभव ठाकूर असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, तो उलवे नोड येथील राहणारा आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव ठाकूर हे कारने पनवेल ते उलवे जेएनपीटी रोडने प्रवास करत होते. यावेळी पुष्पक नगर येथे त्यांची कार आली असता भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात वैभव ठाकूर हे जखमी झाले. या अपघातानंतर पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.