| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल सिटी किकबॉक्सिंग असो.च्यावतीने ‘पनवेल सिटी किकबॉक्सिंग चषक’ ही राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा सेंट अँड्य्रूज इंटरनॅशनल स्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विविध तालुक्यांतील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये म.ए.सो. क्रीडावर्धिनी कळंबोली येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले. त्यात ओम कोठावळे (इ.6वी) याने सुवर्णपदक पटकावले. तर, अनुष्का गोरड (इ.5वी), श्री वीरकर (इ.4थी), कर्तव्य धनगर (इ.4थी) व स्वरा कालेल (इ.3री) यांनी रौप्यपदकाची कमाई केली. या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.






