| महाड | प्रतिनिधी |
किरकोळ कारणावरून भांडण झाल्यानंतर एका 64 वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली आणि तिचा ब्लाउज फाडण्यात आला. महाड शहरातील नवे नगर भागात ही घटना घडली आहे. परंतु, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाड शहरातील नवे नगर भागातील कुणबी आळी येथे सुरज भोसले, भूषण भोसले, सुमेध प्रमोद भोसले, यांनी संगनमत करून तारामती भुवड व अनिल भुवड यांना मारहाण करत असताना त्यांना सोडविण्याकरिता रोहित चीवीलकर, रुपेश चिविलकर व हर्षल चिविलकर गेले असता वरील चारी आरोपींनी त्यांना लाथा बुक्क्याने मारहाण केली. 64 वर्षाच्या नर्मदा रमेश चिविलकर यांना धक्काबुक्की करून व मारहाण करून त्यांचा ब्लाऊज फाडण्यात आला. तसेच, यावेळी ही मारहाण करीत असताना या तरुणांपैकी नितीन काप, निलेश वाघमारे, संतोष रक्ते, ओमकार काप यांनी मारामारी करीत ठार मारण्याची धमकी दिली. संतोष रक्ते याने त्याच्या जवळील काठीने वृद्ध महिलेस डोक्यात मारहाण केली याप्रकरणी उषा दिनेश सिविलकर तिच्या उजव्या हाताच्या पंजाला दुखापत झाली असून, याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत व सहाय्यक फौजदार लांबे हे तपास करीत आहेत. परंतु, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.