महाड तालुका ख.वि.संघ निवडणूक

| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकी मध्ये काँग्रेस महाविकास आघाडीला 12 जागा तर शिंदे गटाला अवघ्या 3 जागा देण्यात आल्या असून निवडणूक बिनविरोध झाली आहे.

तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघावर गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. यावर्षी शिवसेनेच्या शिंदे गटाने देखील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न करण्यात आल्यानंतर पंधरापैकी बारा उमेदवार काँग्रेस महाविकास आघाडीचे निवडून आले, तर तीन उमेदवार शिवसेनेच्या शिंदे गटाचे बिनविरोध निवडून आले. काँग्रेसचे रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष नानासाहेब जगताप यांच्यासह, तालुका अध्यक्ष राजुशेठ कोरपे, चेअरमन बंडूशेठ देशमुख, महेश महाडीक, अनिल बेल, संदेश गोठलं, धोंडीराम डोंबे, आत्माराम लाड, शंकर महाडीक, आर.एन. देशमुख, नथुराम धामणे, सौ.भोसले हे संचालक बिनविरोध निवडणून आले.

Exit mobile version