संकटांच्या खाईत महाड तालुका

बिरवाडीत वायूगळती
मृतदेहांचा पडतोय खच
60 सापडले
50 अजूनही ढिगार्‍याखालीच?
महाड | भारत रांजणकर |
संकटांचे डोंगरच महाड तालुक्यावर कोसळू लागलेत.आधी प्रचंड पाऊस,त्यामुळे आलेला महापूर,वाड्यावस्त्यांवर कोसळलेल्या दरडी यामधून महाडकर जात असतानाच शनिवारी बिरवाडीनजीक ढळकाठी, खरीवली येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्याने जीव वाचविण्यासाठी बिरवाडी परिसरातील नागरिक वाट फुटेल तिकडे पळत राहिले.
महाड येथे तळीये येथील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील ढिगार्‍याखाली दबलेल्या मृतदेहांचे शोध मोहीम कार्य आज एनडीआरच्या 3 पथकामार्फत व टीडीआरएफची व ग्रामस्थांच्या मदतीने शोध पुन्हा सुरू केले आहे. तळीये हे गाव दराडग्रस्त गावांच्या यादीमध्ये नव्हते. तरीही गेल्या 6 दिवसांपासून स्थानिक प्रशासनातर्फे रेड अलर्ट देण्यात येत होता. तरीही नागरिक आपल्या घरात राहत होते.
जिल्ह्यात दरदग्रस्त भागातील एकूण 1000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. महाड तालुक्यात व पोलादपूर तालुक्यातील ढिगार्‍याखाली दबलेल्या अपघातातील एकूण 60 मृतदेह काढण्यात आले आहेत. यामध्ये 10 वर्षा खालील 7 बालकांचा समावेश आहे.
तळीये मधून एकूण 49 मृतदेह मिळाले असून 11 पोलादपूर येथील दुर्घटनेचे आहेत अशी अधिकृत माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप इंगोले यांनी दिली आहे. पोलादपूर येथील दरड ग्रस्त केवणाळे येथील ढिगार्‍याखाली दबलेले येथे 6 व गोवेले सुतारवाडी येथे 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
तसेच केवणाळे येथील 2 व गोवेले सुतारवाडी येथील 10 व कुंभार्डे येथील 1 जखमी नागरिकांना पोलादपूर येथे , माणगाव व मुंबई च्या जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तळीयेचे अस्तित्वच नष्ट
महाडमधील तळीये गावाचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. डोंगर कोसळ्याने काही क्षणांत अनेकांचे संसार चिखलात रुतून गेले. अनेक ठिकाणी दरडी कोसळ्याने अनेकांना धोका पोहोचला आहे.

Exit mobile version