। भाकरवड । वार्ताहर ।
श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील भाकरवड गावचे महादेव शिवराम पाटील यांचे वयाच्या 68 व्या वर्षी बुधवारी (दि. 11) निधन झाले. अत्यंत शांत, मितभाषी आणि सर्वांशी मिळूनमिसळून राहणे हा त्यांचा स्वभाव होता.
महादेव पाटील यांनी आरडीसी बँकेत 35 वर्ष सेवा केली आणि निवृत्त झाले. पाटील यांच्यावर भाकरवड गावाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर ,ग्रामस्थ, मित्रपरिवार उपस्थित होते. यांच्या पश्चात पत्नी, मुलगा उदय पाटील, मुलगी आस्मिता, रुपाली, नातू, सूना, असा मोठा परिवार आहे त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवारी (दि.20) तर उत्तरकार्य सोमवारी (दि.23) राहत्या घरी होणार आहेत.