| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
नागपूर शहरातील हुडकेश्वर येथील महादेव नागुजी तुरणकर (65) हे जुलै महिन्यात बेसा पिपळा रोड येथील आपल्या राहत्या घरातून हरवले आहेत. त्यांच्या हरलविल्याची तक्रार हुडकेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांना ब्रेन ट्युमरचा आजार असून त्यांना विसरण्याची सवय आहे. दरम्यान, महादेव तुरणकर हरविल्याची माहिती सोशल मिडीयावर पसरल्यावर कुटुंबियांना 11 ऑगस्ट रोजी ते मुंबईतील गोरेगाव ते बोरीवली दरम्यान लोकलने प्रवास केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ते पनेवल एसटी स्टँड जवळ दिसल्याची माहिती मिळाली होती. महादेव तुरणकर यांनी अंगात फिकट निळा रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट घातली असून त्यांच्याजवळ काळ्या रंगाची छत्री आहे. या व्याक्ती बाबत कोणाला माहिती मिळाल्यास हुडेश्वर पोलीस ठाणे (0712-2950167) रोहित तुरणकर (9022436306) व राहुल (8788126848) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







