| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यादरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी मंगळवारी (दि.30) ‘अ’ प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी काँग्रेसच्या नेत्या श्रुती म्हात्रे या देखील उपस्थित होत्या. महादेव वाघमारे हे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच पक्ष प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
महादेव वाघमारे यांचा अर्ज दाखल
