प्रकल्पग्रस्तांचे महाधरणे आंदोलन

| उरण | वार्ताहर |

स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधवांवर नेहमी होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठविण्यासाठी व प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रांवर नेहमी होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ सिडको प्रशासन विरोधात नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघतर्फे मंगळवार (दि 20) सकाळी 10 वाजता सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी महासंघतर्फे विविध मागण्या मान्य करण्याची मागणी सुद्धा करण्यात येणार आहे.

भूमिपुत्रांनी तसेच प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय हक्कासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघचे अध्यक्ष कॉ. भूषण पाटील, कार्याध्यक्ष दिपक पाटील, सरचिटणीस सुधाकर पाटील, समन्वयक ॲड. दिपक ठाकूर,उपाध्यक्ष ॲड. विजय गडगे यांनी केले आहे.

Exit mobile version