पाण्याविना महाडकरांचे हाल

पाईपलाईन फुटल्याने दोन दिवस पाणीपुरवठा खंडित

| महाड | प्रतिनिधी |

महाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कोथुर्डे धरणातील पाईपलाईन चापगाव गावाजवळ फुटल्याने महाड शहरात गेली दोन दिवस पिण्याचे पाणीच आले नाही. यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. चापगाव येथे ग्रामपंचायतीमार्फत असताना जेसीबी यंत्रणे ही पाईपलाईन फुटली गेल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.

चापगाव गावाजवळ दि. 30 जानेवारी रोजी गावातील पाणीपुरवठा योजनेतील विहिरीचे काम सुरू असताना जेसीबी यंत्राने पाईपलाईन फुटली गेली, यामुळे हजारो लीटर पाणीदेखील वाया गेले. पाईपलाईन फुटल्यामुळे महाड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ धाव घेऊन कोथुर्डे धरणातील पाणीपुरवठा बंद केला. यामुळे गेली दोन दिवस महाड परिसरात पाणी आलेले नाही. याबाबत महाड नगरपालिकेने झालेल्या गैरसोयीबाबत नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
चापगाव गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असताना जेसीबीमुळे ही पाईपलाईन फुठली गेली. यामुळे पाणीपुरवठा पूर्ववत करून देण्याची जबाबदारीदेखील सदर ग्रामपंचायतीने घेतली असल्याचे महाड मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली. गुरुवारी संध्याकाळपर्यंत पाईपलाईनचे काम केले जाऊन पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता रोहित भोईर यांनी दिली.

Exit mobile version