महंत विवेकानंद शास्त्रीचें नडवली येथे जल्लोषात स्वागत

| खांब | वार्ताहर |

खांब सिद्धेश्‍वर संस्थान बीड येथील महंत तथा तळवलीतर्फे अष्टमी या गावचे सुपुत्र विवेकानंद शास्त्री यांचे नडवली येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रोहा तालुक्यातील खांब पंचक्रोशीच्यावतीने श्री.क्षेत्र नडवली येथे संपन्न होत असलेल्या 67 व्या अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी महंत विवेकानंद शास्त्री यांच्या हरिकिर्तनरुपी सेवेचे आयोजन दि.5 मार्च रोजी करण्यात आले होते. यावेळी संपुर्ण नडवली ग्रामस्थ, महिला मंडळ व तरूण मंडळ तसेच मुंबई ठाणे मंडळ व आदिवासीवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. किर्तनरूपी सेवेला आगमन होतात महंत विवेकानंद शास्त्री यांनी गावातील श्री राम मंदिरातील देवतांना वंदन केले आणि त्या मंदिरापासून ते किर्तन सभा मंडपापर्यन्त लाठी काठी, ढोल ताशा, खालूबाजा व लेझीम पथकाच्या तालावर वाजत गाजत तसेच जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणा देऊन शास्त्रीचे भव्यदिव्य व मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. शास्त्रीचे गावात आगमन होताच प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंद व उत्साह दिसून येत होता. तर त्यांच्या किर्तनरूपी सेवेचे श्रवण करण्यासाठी रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थिती नोंदवून श्रवणाचा लाभ घेतला.

Exit mobile version