पीएनपी महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून शनिवारी (दि.06) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

प्रास्तविकात इतिहास विभागाचे प्रा. साईनाथ पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या विद्यार्थिनी गौरी पुरोहित, श्रुती घरत, वेदांती भोईर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयातील प्रा. वृषाली घरत, डॉ. अमृता कुमारी, प्रा. मिलिंद घाडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर भाष्य केले. आपल्या अध्यक्षीय वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनावर काव्यमय प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील कार्यालयीन सल्लागार गबाजी गिते, प्रा. कैलास सिंह राजपूत, प्रा.स्वराली ठाकूर, प्रा. हर्षल काटे तसेच इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या प्रा.संपदा शिंदे व आभार प्रदर्शन प्रा. पूजा पाटील यांनी केले.

Exit mobile version