| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने राज्य पॅनलवर स्कोअरर्सना समाविष्ट करण्यासाठी जुलै व ऑगस्ट 2024 मध्ये एक परीक्षा आयोजित करणार आहे. हि परीक्षा सर्व उमेदवारांसाठी खुली आहे. परीक्षा शुल्क 500 रु. अधिक जीएसटी म्हणजे एकूण 590 रुपये एवढी असेल. परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख 7 जुलै 2024 आहे. यातारखे नंतर प्राप्त झालेल्या नोंदणी स्वीकारल्या जाणार नाहीत.
महत्वाच्या सुचना–
1) नोंदणी फार्ममध्ये प्रदान केलेल्या एमसीए क्यूआर कोडवर पेमेंट करणे आवश्यक आहे. पेमेंटचा पुरावा (स्क्रिनशॉट) अपलोड करणे आवश्यक आहे.
2)नोंदणीच्या अंतिम तारखेनंतर सर्व उमेदवारांना अभ्यासक्रम, स्वरूप आणि परीक्षेचे वेळापत्रक कळवले जाईल.
3)प्राप्त झालेल्या नोंदणीच्या संख्येवर अवलंबून, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मुख्य राज्य पॅनल परिक्षेपूर्वी प्राथमिक तपासणी परीक्षा आयोजित करू शकते .
4)नोंदणीमध्ये चुकीची माहिती दिली असल्यास किंवा परीक्षा शुल्क न भरल्यास नोंदणी न स्वीकारण्याचा अधिकार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राखून ठेवतो.
अधिक माहितीसाठी संपर्क – मंगेश नाईक मो.नं – +91 9823438911.
स्कोअरर्सच्या परीक्षेची नोंदणी करण्यासाठी लिंक – https://bit.ly/mcascorers
रायगड जिल्ह्या क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व क्रिकेट स्कोअरर्सना एमसीए परीक्षा देण्यासाठी आव्हान केले आहे,तसेच परिक्षेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आरडीसीए सदस्य व जिल्ह्यातील एमसीए स्टेट पॅनल पंच अँड.पंकज पंडित- 8149252829 व सुयोग चौधरी- 8104887900 यांच्याशी संपर्क साधावा.