| नेरळ | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाचे निमित्त साधून कर्जत संगीत सभेने पंडित सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांच्या मैफलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. कर्जत येथील विद्या विकास मंदिर शाळेच्या सभागृहात आयोजित संगीत कार्यक्रमात गायक कलावंत अक्षय जोशी आणि साई दास्ताने यांनी आपल्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
गजानन सामवेदीका संगीत अकॅडमी कर्जत यांच्या माध्यमातून असे कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात. सादरीकरणाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून दिली. गायक कलावंतांना छगन निमणे, सनद दळवी, मंदार खानावकर, अनिल करंजकर यांनी साथ दिली. स्वये श्रीराम प्रभू ऐकती, राम जन्माला ग सखी, समाधी साधन संजीवन नाम, घन निळा लडिवाळा, आकाशी झेप घे रे पाखरा, जिवलगा कधी रे येशील तू, प्रथम तुज पाहता, एकाच या जन्मी जणू, सखी मंद झाल्या तारका, हृदयी प्रीत जागते, धुंदी कळयांना-युगुल गीत, नवीन आज चंद्रमा युगुल गीत, कुणीतरी तरी बोलवा दाजिबाला (लावणी), थकले रे नंदलाला (लावणी), विठू माउली तू, देव देव्हार्यात नाही, ब्रम्हा विष्णु, नाम घेता मुखी राघवाचे, झाला महार पंढरीनाथ, निजरूप दाखववा या गाण्यांनी मैफलीला बहर आणला.
याप्रसंगी कर्जत संगीत सभेचे पाटील, जेनी शाह, गार्गी सदावर्ते, रोहिणी कुंटे, निशा कुंट, गजानन संगीत क्लासचे विद्यार्थी व पालक, देशमुख परिवार माणगावकर, स्नेहल साठे, भक्ती जोशी, प्रसाद बुवा पाटील, गौतम वैद्य, सुचिता वांजळे, दिपक कुलकर्णी, लता शिंदे, आरती गोखले, निलिमा केतकर, नरेंद्र टिळक, गिरीश पटेल, अजित सावंत, विजय वाणी यांच्यासह आदी रसिक प्रेक्षक उपस्थित होते.