। बदलापूर । प्रतिनिधी ।
सामाजिक कार्यकर्त्या दिक्षा शैलेश सोनावणे यंदाच्या महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. शुक्रवारी 25 नोव्हेंबरला मानखुर्द येथे पार पडलेल्या एम.एफ.ए.फिल्मस इंटरनॅशनल प्रस्तुत महाराष्ट्र आयकॉन अँवार्ड्स 2022 या सोहळ्यात आयोजक फैसल खान यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच सावली सेवा फाऊंडेशन ही सामाजिक संस्थादेखील पुरस्काराची मानकरी ठरली.
दिक्षा सोनावणे यांनी शिक्षण,रोजगार,आरोग्य,पर्यावरण,सांस्कृतिक,कला,क्रीडा, मनोरंजन,विज्ञान,तंत्रज्ञान,नागरीकांच्या रेशनिंग विषयक हक्कांची जनजागृती करणे आदी विषयांसह महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यास समाजसेवक महेंद्र वर्मा, वरिष्ठ पत्रकार मुकेश शाही व वरिष्ठ पत्रकार आसिफ अली, सामाजिक कार्यकर्ता निलेश पाटील व समाजसेवक भाऊसाहेब कातुरे तसेच पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.