महाराष्ट्राचे पुरुष-महिला कबड्डी संघ जाहीर

अहमदनगरचा शंकर गदई, पुण्याच्या स्नेहल शिंदेकडे नेतृत्वाची धुरा

| मुंबई | प्रतिनिधी |

कंकारिया, अहमदाबाद, गुजरात येथे होणार्‍या 36व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. ने आपले पुरुष व महिला संघ जाहीर केले. अहमदनगरच्या शंकर गदईकडे पुन्हा एकदा पुरुष, तर पुण्याच्या स्नेहल शिंदेकडे महिला गटाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. काही दिवसाच्या सरावा नंतर हे अंतिम संघ जाहीर करण्यात आले.

भारतीय ऑलम्पिक व गुजरात ऑलम्पिक संघटनेचेच्या संयुक्त विद्यमाने व गुजरात राज्य शासनाच्या सहकार्याने या स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. ईका इरिना ट्रान्स बंदिस्त क्रीडा संकुल येथे दि. 26 सप्टेंबर ते 01ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धा खेळविण्यात येतील. सध्या हे दोन्ही संघ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथील बंदिस्त संकुलातील मॅटवर सराव करीत आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी आज हे संघ एका पत्रकाद्वारे प्रसार माध्यमाना कळविले आहेत. अंतिम निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे.

पुरुष संघ :- शंकर गदई (संघनायक) – अहमदनगर, मयूर कदम – रायगड, असलम इनामदार, अक्षय भोईर – ठाणे, आकाश शिंदे – नाशिक, किरण मगर – नांदेड, अरकम शेख – मुंबई उपनगर, पंकज मोहिते – मुंबई शहर, राहुल खाटीक – अहमदनगर, सिद्धेश पिंगळे – मुंबई शहर, अजिंक्य सुनील पवार – रत्नागिरी, सचिन पाटील – पुणे. प्रशिक्षक:- प्रशांत चव्हाण, व्यवस्थापक:- आयुबखान पठाण, फिटनेस ट्रेनर:- पुरुषोत्तम प्रभू.

महिला संघ :- स्नेहल शिंदे(संघनायिका), पूजा शेलार, अंकिता जगताप, सायली केरीपाळे – पुणे, सोनाली शिंगटे, रेखा सावंत, पूजा यादव, मेघा कदम, रक्षा नारकर – मुंबई शहर, सायली जाधव – मुंबई उपनगर, सोनाली हेळवी – सातारा, निकिता लंगोट – परभणी, प्रशिक्षक :- संजय मोकल, व्यवस्थापिका:- मेघाली कोरगांवकर-म्हसकर, फिटनेस ट्रेनर:- वंदना कोरडे.

Exit mobile version