रामावर एवढं प्रेम असेल, तर सीतामाईचं संरक्षण करा

राष्ट्रवादी नेते जयंत पाटलांचा हल्लाबोल

| नागपूर | वृत्तसंस्था |

राज्यातील बलात्काराच्या घटनेत गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. बलात्काराच्या घटनेत आपल राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सध्या देशात पहिल्यांदाच राम अवतरत आहे की, काय असे वातावरण आहे. रामावर एवढच प्रेम असेल, तर सीतामाईचे संरक्षण करा, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटल यांनी केला. राज्यात कायदा सुवस्था बिघडली आहे. बिहार राज्याला आपण बोलायचो आता आपल्या राज्यात ती स्थिती आलीय. घटना घडली, तर गुन्हा दाखल करायचा नाही. गुन्हा दाखल झाला, तर तपास करायचा नाही, अशी परिस्थिती आहे, असे पाटील म्हणाले.

ललित पाटील प्रकरणात मंत्री त्याला रुग्णालयता दाखल करतो आणि नंतर त्याला पळून जायला मदत करतो. ही गुन्ह्याची स्थिती आहे, असेही ते म्हणाले. बीडमध्ये घटना घडली त्यावेळी पोलिस अधीक्षक हे माझलगाव येथेे नव्हते. ते फोन बंद करुन बसले होत. जिल्हाधिकारी यांच्या अहवालात यांचा उल्लेख आहे. कोणाचा पाठिंबा असल्याशिवाय असे होऊ शकत नाही, असेही पाटील म्हणाले. आपलं सरकार नोटा छापण्याच काम करत आहे. पुरवण्या मागण्या मोठ्या जाहीर करण्यात आल्या. एक लाख साठ हजार आता राज्याला लागणार आहेत. सिंचन प्रलंबित योजना राज्यात मोठ्या प्रमाणात आहेत. आमचं सरकार गेल्यावर यांनी काहीच केलं नाही. फडणवीस तुटीचा अर्थसंकल्प मांडतात, दुसरीकडे एक लाख कोटी पुरवणी मागण्या आहेत. आमदरांना काही कोट्यावधींचा निधी दिला आहे. निधी वाटपाचे कसलेही नियोजन नसून ही जनतेची फसवणूक आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र हे सुरक्षीत राज्य आहे, रात्री बारा वाजता देखील महिला बाहेर फिरु शततात. 2020 च्या तुलनेत राज्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये घट झाली आहे, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्या आरोपाला उत्तर दिले.

Exit mobile version