राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे संघ जाहीर

| मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने झारखंड राज्य कबड्डी असोशिएशच्या विद्यमाने दि. 27 ते 30 डिसें. या कालावधीत बोकारो स्टील सिटी येथे होणार्‍या 32व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपले संघ आज जाहीर केले. पुण्याचा श्रीधर कदमकडे किशोर, तर परभणीच्या समीक्षा तुरेकडे किशोरी गट संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. नुकत्याच लातूर येथे 15 ते 18 डिसें. या कालावधीत झालेल्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला. किशोर गटातील विजेता परभणी व उपविजेता हिंगोली यांच्या 2-2 खेळाडूंनी या संघात स्थान मिळविले आहे. किशोरी गटात विजेत्या सांगलीचे दोन खेळाडू असून उपविजेत्या परभणीने संघाच्या नेतृत्वासह आणखी एका असे दोन खेळाडू या संघात आहेत.

या निवडण्यात आलेल्या संघाचे सराव शिबीर नाशिक येथे घेण्यात आले. नाशिक येथूनच हे संघ रांची एक्सप्रेसने स्पर्धेकरिता रवाना झाले. निवडण्यात आलेल्या या संघाची घोषणा राज्य कबड्डी असोशिएशचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी प्रसार माध्यमाकरिता आज जाहीर केली. ती खालील प्रमाणे.

किशोर गट(मुले) :- 1)श्रीधर कदम(संघनायक)-पुणे, 2)ओम शिर्के-रत्नागिरी, 3)गणेश टेकाम – नाशिक, 4)दिघु दहातोंडे – हिंगोली, 5)लखन राठोड – हिंगोली, 6)सारंग रोकडे – परभणी, 7)मनीष ठेंगडे – नंदुरबार, 8)यश साळवे – अहमदनगर, 9)विजय तारे – परभणी, 10)सिद्धेश भोसले – मुंबई शहर, 11)संदेश बिल्ले – कोल्हापूर, 12)आदित्य भरडे – लातूर.
प्रशिक्षक :- ब्रम्हनाथ मेंगडे व्यवस्थापक :- दत्ता गायकवाड

किशोरी गट(मुली) :- 1)समीक्षा तुरे (संघनायिका) – परभणी, 2)अदिती काविलकर – मुंबई शहर, 3)श्रावणी भोसले – सांगली, 4)बिदिशा शेलार – नाशिक, 5)सायमा पठाण – सातारा, 6)सारा शिंदे – रत्नागिरी, 7)जागृती नांदविकर – मुंबई उपनगर, 8)प्रतीक्षा गुरव – कोल्हापूर, 9)प्राची चंदनकर – सोलापूर, 10)नेहा राठोड – परभणी, 11)श्रावणी सावंत – पुणे, 12)श्लोका पाणबुडे – सांगली.
प्रशिक्षक :- तुकाराम ताम्हणेकर व्यवस्थापिका :- मानसी वझट.

Exit mobile version